• Slide

  • Slide

  • Slide
  • Slide

म्हसळा तालुका


सुस्वागतम्

      म्हसळा तालुका रायगड जिल्हयाच्या दक्षिणेकडील तालुका आहे. म्हसळा शहरातील ग्रामदैवत श्री धाविर देव व मौजे देवघर येथील अमृतेश्वर ही प्रसिध्द देवस्थाने आहेत. म्हसळा हे गाव राजापूर खाडीच्या दक्षिण मुखाशी वसलेले आहे. टॉलेमीने (इ.स. 150 ) मुसोपल्ली म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला आहे तेच म्हसळा असावे. प्राचीन काळी म्हसळा बंदर आयात निर्यात व्यापारासाठी प्रसिध्द होते. म्हसळा तालुका हा पूर्वी जंजिरा संस्थानचा भाग होता.

      म्हसळा तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेती, आंबा, काजू फळपिके हा व्यवसाय असून भात हे प्रमुख पिक आहे. या तालुक्यामधून जानसई व सावित्री या प्रमुख नदया वाहतात. याशिवाय तालुक्यातून राज्य महामार्ग दिघी पुणे क्र 98 व श्रीवर्धन- लोणेरे- पंढरपुर क्र. 99 असून अनुक्रमे 25 व 35 किमी आहेत. या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी रेलचेल असते.Tahasildar