• Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

श्रीवर्धन तालुका


सुस्वागतम्

       श्रीवर्धन तालुका हा महाराष्ट्राच्या दक्षिण दिसेला असून तालुक्याची हदृी पूर्ण होते तेथे बाणकोटची खाडी आहे त्या खाडी पलिकडे रत्नागिरी जिल्हयाची सुरवात होते. सदर तालुक्याची पश्चिम बाजु ही अरबी समुद्राने व्यापलेली आहे. पूर्व बाजूस म्हसळा तहसिल तर उत्तरेस तळा व मांदाडची खाडी आहे.

       मुंबईपासुन दक्षिणेस 200 कि.मी.,ठाण्यापासुन 175 कि.मी.,पुण्यापासुन 175 कि.मी.आहे .मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक166 (जुना क्रमांक 17 )वरील माणगांव शहरा पासून 45 कि.मी.अंतरावर श्रीवर्धन गाव वसलेले आहे. माणगांवपासुन मजेशीर वळणदार नागमोडी रस्त्याने प्रवास करताना पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येतो . पावसाळयात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधब्यांचा आनंद घेत श्रीवर्धन येथे पर्यटक येत असतात.

      श्रीवर्धन हे प्रथम पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान आहे. श्रीवर्धन पासुन सुमारे 19 कि.मी.अंतरावर हरिहरेश्वर हे गाव आहे. श्रीवर्धन गावात पेशवे वाडा आहे .हे एक पर्यटकांचे आकर्षण आहे.

      श्रीवर्धन तालुक्यापासुन 19 कि.मी.अंतरावर हरिहरेश्वर शंकराचे प्रसिध्द मंदिर असुन या मंदिरास दक्षिण काशी म्हणुन प्रसिध्द आहे. श्रीवर्धन पासुन उत्तरेकडे दिवेआगार येथे सुवर्ण गणेश मंदिर ही धामिैक व पर्यटन स्थळ प्रसिध्द आहेत. .या तिन्ही ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. श्रीवर्धन तालुका भौगोलिक विविधतेने नटलेला आहे.या भागात उत्तुंग असे डोंगर द-याही आहेत व समुद्र किनाराही आहे.
Tahasildar