तालुक्याविषयी
अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. तालुक्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. अलिबाग तालुका पर्यटन ठिकाण म्हणूनही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात. कुलाबा किल्ला, कणकेश्वर मंदिर, हे या अलिबाग तालुक्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात.