• Slide

  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

खालापूर तालुका


सुस्वागतम्

      खालापूर तालुका प्रशासकीय विभागाच्या कोकण विभागातील रायगड जिल्हयात आहे. खालापूर तालुक्याच्या पूर्वेस पुणे जिल्हयाची हद्द असून दक्षिणेस सुधागड पाली तालुका, पश्चिमेस पनवेल तालुका व उत्तरेस कर्जत तालुका आहे. खालापूर हा रायगड जिल्हयातील कर्जत उपविभागातील एक विकसीत तालुका आहे. या तालुक्यात ब-यास रासायनिक, प्लॅस्टीक व स्टील कारखाने आहेत. सन 1960 च्या काळात बरेचसे ज्यूट लोक हे खालापूर तालुक्यात राहत होते. 1960 नंतर ते लोक इस्त्राईल या देशात स्थलांतरीत झाले.

      हा तालुका मुंबई पासून पूर्वेस 73 कि. मी. व पुण्या‍पासून 80 कि. मी. अंतरावर आहे. या तालुक्यामधून मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 तसेच मुंबई-पुणे (यशवंतराव चव्हाण) द्रुतगती मार्ग ही जात आहे. त्याच बरोबर खोपोली कर्जत हा रेल्वे मार्ग आहे. तालुक्यामध्ये एकूण 155 महसूली गावांचा समावेश असून 45 ग्रामपंचायती आहेत. तालुक्यामध्ये खोपोली नगरपालिका व खालापूर नगरपंचायत आहे. खोपोली येथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. तसेच मौजे महड येथे वरदविनायकाचे अष्टविनायकांपैकी एक तिर्थक्षेत्र आहे. तालुक्यात एन. डी. स्टुडीओ, झेनिथ धबधबा, मोरबे धरण, रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, मौजे साजगांव येथे बोंबल्या विठोबाचे देवस्थान, उंबरखिंड व ॲडलॅब इमॅजिका मनोरंजन पार्क इ. खालापूर तालुक्या‍तील वैशिष्टयपूर्ण बाबी आहेत.

Tahasildar