• Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

माणगाव तालुका


सुस्वागतम्

      माणगाव तालुका रायगड जिल्हयाच्या दक्षिणेकडील तालुका आहे. ‘मानगड’ वरुन माणगाव हे नाव संबोधित झाल्याचे मानले जाते. काळ नदी व गोद नदी खो-यात, सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी, डोंगरदऱ्यामध्ये माणगाव तालुका वसलेला आहे. मुगवली येथील स्वयंभू गणपती, कडापे येथील कालीकादेवी व माणगाव शहारातील वाकडाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे. उत्तर कोकण व दक्षिण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा यांना जोडणारा माणगाव हा मध्यवर्ती तालुका आहे.

      दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजविणारे व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंत घाडगे माणगाव तालुक्याचे सुपुत्र होते. वडघर येथे साने गुरुजी यांचे राष्ट्रीय स्मारक आहे. चांदोरे येथे पुरातन संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. माणगाव तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी , वरी ही मुख्य पिके आहेत. विळे भागाड येथे एम. आय. डी. सी. आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग 66, विविध शै‍क्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, पोस्को महाराष्ट्र कंपनी व वैद्यकीय सुविधा इ. मुळे माणगाव तालुका प्रसिध्दीस आहे.

      माणगाव तालुक्यातील सहयाद्री पर्वतरांगेत पावसाळी धबधबा, जलधारा व दाट वनराजी यांनी निसर्गरम्य ताम्हिणी घाट, सह्याद्री पर्वतरांगेतील कुंभे, मानगड व रवाळजे येथील राप्टींग पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Tahasildar