• Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide
 • Slide

मुरूड तालुका


सुस्वागतम्

      मुरूड हे ठिकाण मुंबई पासुन 160 किमी अंतरावर आहे॰ निसर्गत: मुरूड तालुका समुद्रालगत चिंचोळया पट्यात अस्तित्वात आहे॰ एका बाजुला समुद्र तर दुस-या बाजुला डोंगर यामुळे मुरूड तालुक्यात येतानाच पर्यटकांना प्रवासाचा मनमुराद आनंद मिळतो॰ मुरूड हे उत्तम नैसर्गिक सौदर्य व ऐतिहासिक स्थळे असलेले पर्यटनाचे ठिकाण आहे॰ दरवर्षी हजारो पर्यटक पर्यटनासाठी, मौज-मजेसाठी येत असतात॰

      मुरुड तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला आहे॰ मुरूड तालक्यामध्ये मुरूड-जंजिरा किल्ला, कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ला, कोर्लई किल्ला, सिध्दीविनायक मंदिर, बिर्ला मंदिर, फणसाड अभयारण्य, गांरबी धरण, काशीद बीच, मुरूड बीच अनेक आकर्षणाची ठिकाणे आहेत॰ जंजिरा किल्ला हा जलदुर्ग प्रकारातील आहे॰ रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगर रांगेतील हा किल्ला टेकर्स च्या दृष्टीने सोपा आहे॰

      जंजिरा किल्यालाच किल्ले मेहरूब उर्फ किल्ले जंजिरा अशी नावे होती॰ येथे येणा-या पर्यटकांसाठी घरगुती जेवणाच्या खानावळी आहेत॰ उत्तम प्रतीचे हॉटेल्स आहेत॰ पर्यटनामुळे येथील लोकांना आर्थिक विकासाला चालना मिळते.Tahasildar