• Slide
  • Slide

पेण तालुका


सुस्वागतम्

      पेण हे शहर भोगावती खाडीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. पेण चे अंतोरे बंदर पूर्वी प्रसिध्द होते. पेणे(मुक्कामाचेठिकाण)यावरुन अपभ्रंशाने पेण असे नांव प्राप्त झाले आहे. पेण हे कोकण रेल्वे व मुंबई-कोकण-गोवा मार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे. पेण हे शहर गणपतीच्या शाडूच्या सुबक मुर्तीसाठी जगप्रसिध्द असून तांदूळ व पोहयासाठी देखील प्रसिध्द आहे.

      प्राचिन काळी पेण ठाण्याच्या शिलाहारांच्या ताब्यात होते. नंतर ते यादवांच्या ताब्यात गेले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत शाहिस्तखान पुण्यात आला असता मुगल सैन्याची एक तुकडी पेण येथे ठेवलेली होती. सन १६६८ मध्ये पेण चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ऐतिहासिक बंदरांमध्ये उल्लेख मिळतो. सदाशिवराव भाऊंची (पानिपतमधील प्रमुख वीर) पत्नी पेणच्या कोल्हटकरांची मुलगी होती. पेणचे कासारतळे रमणीय असून हे तळे मलिकअंबर यांनी बांधले असे म्हटले जाते.

      पेण तहसिल कार्यालयाची मुख्य इमारत ही सन १८२५ मधील असून अदयाप त्याच इमारतीत तहसिल कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज चालू आहे.Tahasildar