• Slide
  • Slide
  • Slide

पोलादपूर तालुका


सुस्वागतम्

      पोलादपूर तालुक्याच्या उत्तरेस महाड तालुका आहे. तसेच पूर्वेस महाबळेश्वर तालुका आहे. पश्चीमेस मंडणगड तालुका आहे व दक्षिणेस खेड तालुका आहे. पोलादपूर तालुका हा रायगड जिल्हयामधील सर्वात छोटा तालुका आहे. हा तालुका राज्य शासनाने डोंगरी तालुका म्हणून घोषित केला आहे. पोलादपूर तालुक्यात एकुण 3 महसूल मंडळे असून 14 तलाठी सजे आहेत. तालुक्यातील प्रमुख पिक भात हे आहे. पोलादपूर तालुका हा निसर्गरम्य असून मोरझोत धबधब्याचा चा वनश्रीने नटलेला परिसर पावसाळ्यात तर हिरवा शालू नेसल्यासारखा वाटतो. नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ हे गाव पोलादपूर तालुक्यातीलच, तसेच कोणताही आधाराशिवाय असलेला वायररोपचा झुलता पूल देखील पोलादपूर तालुक्यातच आहे. त्याचप्रमाणे चंद्रगड ,कांगोरी गड, महीपत गड, हे गड देखील पोलादपूर तालुक्यात आहेत.Tahasildar