• Slide
  • Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

रोहा तालुका


सुस्वागतम्

      रोहा तालुका रायगड जिल्हयाच्या मध्य़भागी आहे. रोहा तालुका हा कुंडलिका नदीच्या तीरावर व कळसगिरी डोंगर भागात वसलेले आहे. रोहा तालुक्यापासून कोकण रेल्वेची सुरूवात होते तसेच मध्य़ रेल्वेचे शेवटचे टोक आहे. अनेक रासायनिक उद्योग येथे कार्यान्वीत आहेत. रोहा शहर पनवेल-रोहा रेल्वेमार्गाने मुंबईशी जोडलेला आहे. रोहा शहरातील धावीर महाराजांचे मंदीर प्रसिध्द़ आहे. तसेच घोसाळे गावातील घोसाळा किल्ला, मेढे येथील अवचितगड, भातसई येथील धबधबा इ. प्रेक्षकांचे मन वेधून घेतात. रोहा तालूक्याचा मुख्य़ व्यवसाय हा शेती असून भात, नाचणी ही मुख्य़ पिक आहेत. रोहा तालुक्यातील सहयाद्री पर्वतरांगेत पावसाळी धबधबा, जलधारा व दाट वनराजी यांना निसर्गरम्य़ आहे. कोलाड येथील राप्टींग पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.


Tahasildar