• Slide
  • Slide
  • Slide
  • Slide

तळा तालुका


सुस्वागतम्

      “तळेगड” हा रायगड जिल्ह्रयातील माणगाव तालुक्याच्या पश्चिमेस इंदापूरपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. व समुद्र सपाटीपासून 1000 फुट ऊंचीवर असून त्याचे पायथ्याशी “तळे” या गावाची मुख्य वस्ती आहे. पेशवे यांनी सिध्दी या हबशी राजाच्या जंजीरा या किल्यावर स्वारी केली तेव्हा राजपूरी प्रांताचा बंदोबस्त केला होता. त्याचवेळी तळे या गडाचे भोवतालची 104 गावे मिळून “तळेमहाल” (पेटा) व त्याचे मुख्य ठाणे महल कचेरी तळेगडाच्या पायथ्याशी स्थापन केली. त्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात. अद्यापही 26 जानेवारी, 1मे व 15 ऑगस्ट अशा राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी तेथे ध्वजवंदन होते. व बाहेरून येणारी मंडळी आर्वजून तळे गडावर जातात.

      तळे गावापासून 10 मैल अंतरावर पश्चिमेस कुडे या गावाजवळ “बौध्दकालीन लेणी” आहेत.जवळच मांदाड हे गाव खाडी लगत आहे. मांदाड या बंदराची वैशिष्टे त्याच्या चारही बाजूला डोंगर असून त्यामुळे वादळ वारे या बंदरात येत नाहीत. तेथून सूर्यास्त अप्रतिम दिसतो. कारण खाडीतील प्रतिबिंब व डोंगराआडचा सूर्य एकाचवेळी अंतर्धान पावतो. या बंदराला “डोअर्स ऑफ अरेबियन सी” असेही म्हणतात.

      इ.स.1758चे सुमारास दिल्ली सुलतानाच्या चिथावणीमुळे ग्रामदैवतेचे मुर्ती भंग झाली होती.परंतू वतनदारांनी चंडीका भवानी देवीची नविन मुर्ती बनविली, परंतू तिला कौल न मिळाल्यामुळे जुन्या मुर्तीस शेंदुराचा लेप देऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली आजही दोन्ही मुर्ती देवालयात आहेत. या जुन्या मंदिरांची फार मोठया प्रमाणावर नुतनिकरण करण्याचे काम कै.दत्तात्रय रामकृष्ण देशमुख यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने पूर्ण केले. आज त्यांचे विश्वस्त‍ मंडळ असून डॉ.म.ग.जोशी हे प्रमुख विश्वस्त‍ सहका-यांच्या मदतीने काम पाहतात. श्री.चंडिका देवीची यात्रा मोठया प्रमाणात भरते व त्याबरोबर बापूजी देव यात्रा, श्री.रामनवमी यात्रा,श्री.द्रोणागिरी यात्रा ही भरत असतात व होळी महोत्स्व, नवरात्रोत्सव व दहिकाला उत्सव संपन्न होत असतो.

Tahasildar