• Slide
  • Slide

उरण तालुका


सुस्वागतम्

      उरण तालुका रायगड जिल्हयाच्या उत्तरेस असून मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 60 कि.मी. अंतरावर आहे. उरण तालुक्यात एकुण 65 गावे असून 35 ग्रामपंचायती आहेत.

      उरण तालुक्यातील मौजे घारापूरी (एलिफंटा) येथे जगप्रसिध्द अशी कोरीव लेणी असून त्याठिकाणी जगभरातून लाखो पर्यटक् भेट देतात. त्याठिकाणी जाणेसाठी गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथून जलमार्गाने (लाँचने) प्रवास करुन त्याठिकाणी यावे लागते. सदर पर्यटनामधून मोठया प्रमाणात भारताला परकिय चलन उपलब्ध होते. तसेच उरण येथून (मोरा) बोटीने सदर बेटावर जाता येते. सदर बेटावर गुंफा असून त्याठिकाणी त्रिमुखि शंकराची सुंदर मुर्ती असून नटराज मुर्ती व शिव कथेवर आधारित लेणी अस्तित्वात आहेत.

      उरण तालुक्यात जेएनपीटी सारखे जगप्रसिध्द बंदर उपलब्ध् असून पूर्ण जगभरात मोठया जहाजामधून मालवाहतूक होते व भारतात येणारा माल त्याठिकाणी येऊन तेथून पूर्ण भारतामध्ये तो पोहोचविला जातो. सदरचा माल नेणे व आणणेसाठी रेल्वे, ट्रक, टँकर वाहतूकीमार्फत् वाहतूक केली जाते. त्यामधून देशाला फार मोठया प्रमाणात उत्पन्न मिळते व त्यापासून अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध् झालेले आहेत. त्याचप्रमाणे उरण (बोकडविरा) येथे गॅसवर वीज निर्माण करणारा एकमेव GTPS सारखा विदयुत प्रकल्प उभा आहे. त्यामधून येथिल औदयोगिक कारणासाठी वीज पुरवठा केला जातो. तसेच बीपीसीएल व ओएनजीसी सारखे मोठे उदयोग या तालुक्यात उपलब्ध् असून शासनास मोठया प्रमाणात उत्पन्न देणारा हा औदयोगिक तालुका म्हणून पूर्ण भारतामध्ये ओळखला जातो.

Tahasildar